गॅस गळतीमुळे नऊ जणांचा मृत्यू

गॅस गळतीमुळे नऊ जणांचा मृत्यू

पंजाब / प्रतिनिधी -  लुधियानात शेरपुर चौकात रविवारी सकाळी सुआ रोडवर एका कारखान्यात गॅस गळती झाली. यात किमान 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गॅस गळती सकाळी सव्वा सातच्या सुमारास सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. लुधियानाच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितलं की, गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडलीय. एनडीआरएफचे पथक अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ११ जणांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात गारपीट वादळी पावसाचे थैमान सुरूच, पुढचे 48 तास अतिमहत्वाचे गॅस गळती झालेल्या भागात ३०० मीटर परिसरातील लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामुळे परिसर रिकामा करण्यात आला असून इतरत्र हलवण्यात येत आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा