विवेकानंद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
औरंगाबाद /प्रतिनिधी - विवेकानंद कला , सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कनिष्ठ विभाग आयोजित पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. विभागीय शिक्षण मंडळ आयोजित सराव परिक्षा संदर्भात हा पालक मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. डी. आर. शेंगुळे सर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. एम.एम.मुरंबीकर , कला व वाणिज्य विभागाचे पर्यवेक्षक गणेश दळे, विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक साबळे बी. आर. आणि एम सी व्ही सी विभागाच्या सिद्दीकी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.एन. दळे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये बोलतांना सरांनी महाविद्यालयात चालू असलेले विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमच मुख्य मार्गदर्शन हे महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. एम.एम.मुरंबीकर यांनी केले. त्यात त्यांनी पालक मेळावा ठेवण्यामागे असलेला उद्देश स्पष्ट केला, ' शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षेचे स्वरूप विस्ताराने मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.डी.डी.शेंगुळे सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.ए.एस. पारदे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व विभागाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हातभार लावला. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालकांनी उपस्तिथी दर्शविली.
यावेळी अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये वंदना मुरंबीकर यांनी '' शासनाने चाचणी परीक्षेचा उपक्रम लवकर राबवायला हवा होता, जेणेकरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त परिक्षा देता आल्या असत्या.' असे सांगितले तर
प्रा.रामप्रसाद डोंगरे यांनी''शासनाचा उपक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे. यातुन कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून निघेल.'' अशी अशा व्यक्ती केली. प्रशांत वाडे यांनी उशिरा का होईना उपक्रम सुरू होतोय. विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी या उपक्रमाचा खुप फायदा होणार आहे." असे मत व्यक्त केले.