नेहरू युवा केंद्र मार्फत क्लीन व ग्रीन व्हिलेज प्रशिक्षण कार्यक्रम
वाळूज / संजय काळे - घानेगांव परीसरातील श्रीकृष्ण जुनियर महाविद्यालयात (दि.18) रोजी नेहरू युवा केंद्र आणि विश्व युवा मंङळ याच्या संयुक्त विद्यमाने क्लीन व ग्रीन व्हिलेज प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संचालक सोपान सातपूते, विश्व युवा मंडळाचे प्रकाश ञिभूवन, व्यसन मुक्ती प्रचारक प्रा.संजय काळे, ङाँ.पोपट मोठे, प्रशासकीय अधिकारी एन.एस.हराळे, शेख अजीम आदीची उपस्थिती होती .यावेळी बोलतांना व्यसन मुक्त प्रचारक प्रा.संजय काळे बोलतांना म्हणाले की, सुजलाम सुफलाम आरोग्य होण्यासाठी आजच्या काळात स्वच्छतेचे पालन करावे, गाव, शहर, आणि देश स्वच्छ सुंदर होण्यासाठी संकल्प करून यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा.मयुर मगर तर आभार प्रा.नितीन मगर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता युवक कार्यकर्ते दिलीप नरवडे प्रा.गणेश रणखांब आदीनि परिश्रम घेतले.