ऐतिहासिक इमारतींची माहिती आता क्यू आर कोड मार्फत

ऐतिहासिक इमारतींची माहिती आता क्यू आर कोड मार्फत

औरंगाबाद /प्रतिनिधी - शहरातील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहितीचे क्यू आर कोड तयार करण्याचे निर्देश आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिले.
 आज संध्याकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात जी-20 च्या पार्श्वभूमीवर ब्रॅण्डिंग समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपली.
 सदरील बैठकीत त्यांनी शहरातील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहिती क्यू आर कोड मध्ये उपलब्ध करून त्या इमारतीसमोर लावण्याचे निर्देश दिले जेणेकरून कोड स्कॅन केल्यावर त्या वस्तूची माहिती पर्यटकांना  सहजपणे उपलब्ध होतील.
 जी-20 परिषद साठी वातावरण निर्मिती करण्याकरिता शाळेतील चित्रकला स्पर्धा चे आयोजन करणे, तसेच जी20 परिषद नेमकी काय आहे? याची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व शाळांमध्ये  विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 याशिवाय परिषदेत सहभागी होणारे सर्व वीस देशांचे झेंडे शहरातील लावण्याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी सांगितले.
सदरील बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी शिक्षण अधिकारी संजय सोनार स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी आणि जलसंपर्क अधिकारी टॉसिफ अहमद यांची उपस्थिती होती.

किले अर्क येथील बौद्ध विहाराची पाहणी

किले अर्क येथील करुणा बौद्ध विहार व सुधाकरराव भुईगड सामाजिक सभागृह चे नूतनीकरण करणे बाबत आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी स्थळ पाहणी केली.
सदरील नूतनीकरणाच्या कामात सामाजिक सभागृहाच्या इमारतीच्या उजव्या कोपऱ्यावरील मुख्य दरवाजा  स्थलांतरित करून तो सभागृहाच्या मध्यभागी मुख्य दरवाजा बसविणे, सभागृहाच्या समोरील भिंतीचे एलिवेशन ट्रीटमेंट बदलणे इत्यादी कामांचा समावेश होता.
याबाबत प्रशासक महोदयांनी मुख्यद्वार स्थलांतरित करण्याची मंजुरी दिली तसेच सभागृहात शौचालय बांधणे आणि छताची वॉटरप्रूफिंग करणे संदर्भात सूचना केल्या.
यावेळी शहर अभियंता एबी देशमुख, वॉर्ड अभियंता के एम काटकर, कनिष्ठ अभियंता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा