युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन संपन्न
सिल्लोड / प्रतिनिधी - जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते संपन्न झाले. दि.15 सप्टेंबर रोजी शहरातील महादेव मंदिर परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन युवानेते अब्दुल समीर यांनी रक्तदान शिबिर उदघाटन प्रसंगी केले. गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल अब्दुल समीर यांनी जय श्रीराम गणेश मंडळाचे प्रशंसा करीत अभिनंदन केले. दरम्यान इतर गणेश मंडळाच्या माध्यमातून देखील गणेश भक्तांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले पाहिजे असे मत समीर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी रक्तदान केलेल्यांना अब्दुल समीर यांच्याहस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक जितू आरके, अकिल देशमुख, जगन्नाथ कुदळ, शिवसेना शहर उपप्रमुख रवी रासने, संतोष धाडगे, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे,राजेश्वर आरके, फईम पठाण, सतीश सिरसाट, निलेश शिरसाट, संकेत नसवाले , अनिकेत पाटील, संदीप जाधव, राहुल राऊत, विनोद पैठणकर, रामेश्वर एंडोले, राहुल पवार, अनिल पैठणकर, प्रकाश उनमेक, शुभम पंडित, मयूर टोम्पे, गणेश चंदनसे आदींची उपस्थिती होती.