मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती सध्या केली पाहिजे - प्रा.डॉ. प्राजक्ती भोसले

मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती सध्या केली पाहिजे - प्रा.डॉ. प्राजक्ती भोसले

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी - विवेकानंद महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त मानसशास्त्र विभागाने प्रा.डॉ. प्राजक्ती वाघ-भोसले (मानसशास्त्र विभागप्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय, वाळूज) यांचे व्याख्यान आयोजित केले होते.  याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अरुणा पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. 

 डॉ. प्राजक्ती  भोसले   आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या शिक्षणातून मुलींनी स्वतःचा विकास केला पाहीजे. आईवडीलांचे स्वप्न साकार करण्याचे काम मुलींनी केले पाहिजे, तसेच आईवडीलांच्या कष्टाची व  मेहनतीची जाणीव ठेवली पाहीजे. 

 अध्यक्षीय समारोपात डॉ. अरुणा पाटील  यांनी मुलींनी स्वावलंबी बनावे, कॉलेज जीवनामध्ये स्वतःच्या करियरकडे लक्ष द्यावे जेणेकरून उद्याचे भविष्य उज्ज्वल होईल. स्वतःचे स्वप्न पूर्ण करावयाचे असतील तर विद्यार्थी जीवनात  मेहनत घेतली पाहीजे.


  याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. रवींद्र शिंदे हे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान बोचरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.शमीम सय्यद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. महेश मरकड, डॉ. राम वजीरे, डॉ. शिवाजी तलवारे, अयुब बेग यांनी प्रयत्न केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा