हिंस्र पशुचा लहान बालकांवर हमला
कन्नड / प्रतिनिधी - कन्नड तालुक्यातील जेऊर येथे एका हिंस्त्र पशूने आतापर्यंत ४ बालकांना चावा घेतला आहे. बालकांची स्थिती अतिशय भयावह आहे त्यामुळे चावा घेणारा पशू कुत्रा आहे की लांडगा हे सांगणे कठीण झाले आहे. परंतू हा प्राणी मुलांच्या तोंडाचाच चावा घेत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
जेऊर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चार पाच बालकांना तोंडाला चावा घेतला आहे. कुत्रा आहे की लांडगा अद्याप समजलेले नाही कारण तो डायरेक्ट तोंडावर हल्ला करतो. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांचा चेहरा पूर्ण विद्रूप झाला आहे.