स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायण सप्ताह उत्साहात प्रारंभ

स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायण सप्ताह उत्साहात प्रारंभ

औरंगाबाद / प्रतिनिधी - दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत दत्त जयंती निमित्त बजाजनगरातील  स्वामी समर्थ केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह उत्साहात प्रारंभ झाला.
   सकाळी आठच्या भूपाळी आरतीनंतर सामुदायिक गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करण्यात आले . तसेच सकाळी १०:३० च्या आरतीनंतर विविध यागांचे आयोजन करण्यात आले आहेत. सोमवारी गणेश व मनोबोध याग,मंगळवारी गिताई याग ,बुधवार  चंडीयाग,गुरुवार स्वामीयाग,शुक्रवार रुद्र व मल्हारी याग अशा रितीने विविध सेवा पार पडणार आहेत. सायंकाळी ६ वा औदुंबर प्रदक्षिणा तर ६:३० च्या आरतीनंतर विविध विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.रोज सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत महिला तसेच रात्री आठ ते सकाळी आठ या वेळत पुरुष भाविक सेवेकरी रोज एक तास विनावादन,स्वामीचरित्र वाचन,श्री स्वामी समर्थ जप या प्रकारे प्रहरेची सेवा रुजू करतील. तसेच शनिवारी दुपारी १२:३९ वा गुरुचरित्र मधील चौथ्या अध्यायाचे वाचन करून दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.दुसऱ्या दिवशी रविवारी १९ डिसेंबर रोजी सत्यदत्तपूजन व १०:३० वा महानैवेद्य आरती होऊन सप्ताह समारोप होईल. सुमारे ५०० भक्त पारायण यासाठी बसले आहेत. तसेच महाप्रसादाबरोबरच रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपण कारण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसरातील सेवेकरी व भाविकांनी सदरील सेवेत सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ मंदिराच्या पारायन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा