अभाविप छात्र नेता संमेलन उत्साहात संपन्न
औरंगाबाद/ प्रतिनिधी- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे छात्रनेता संमेलन एमजीएम विद्यापीठ कॅम्पसमधील आर्यभट्ट हॉल या ठिकाणी उत्साहात संपन्न झाले. या छात्रनेता संमेलनात व्यासपीठावर प्रमुख वक्ते अभाविप प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हाप्रमुख डॉ. सुरेश मुंडे, महानगरमंत्री निकेतन कोठारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून छात्रनेता संमेलनास सुरुवात करण्यात आली.
प्रा.डॉ.सुरेश मुंडे यांनी छात्रने ता संमेलनाचे प्रास्ताविक केले. महानगर मंत्री निकेतन कोठारी यांनी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षभराच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सोडवलेल्या शैक्षणिक समस्या, सामाजिक समस्यांना घेऊन केलेले आंदोलने, विविध कार्यक्रम, कोरोना काळात केलेले सेवाकार्य, रक्तदान शिबीरे या सर्वाचा लेखाजोखा मंत्री प्रतिवेदनात मांडला. निकेतन कोठारी यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षाची महानगर कार्यकारिणी व नगर कार्यकारणी विसर्जित केली. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची नुतन महानगर कार्यकारिणी घोषणा निर्वाचन अधिकारी डॉ. गजानन सानप यांनी केली. महानगर अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.योगिता पाटील यांची फेरनिवड तर महानगरमंत्री म्हणून नागेश गलांडे यांची निवड करण्यात आली. नागेश गलांडे यांनी नूतन महानगर कार्यकारिणी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर (वाळुज भाग), स्वामी विवेकानंद नगर (सिडको भाग), छत्रपती शिवाजी महाराज नगर (मध्य भाग) या नगरांच्या कार्यकारिणीची घोषणा केली. तसेच आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एकजुटीने कार्य करण्याचे व शिक्षण क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अभाविप कटिबद्ध राहील असे महानगरमंत्री नागेश गलांडे यांनी सांगितले.
विद्यार्थी परिषद नेतृत्व विकसित करणारी खुली पाठशाळा असून महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या आवढीच्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळवून देणारी जगातील एकमेव विद्यार्थी संघटना असल्याचे मत प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन सुमेध मनूरकर यांनी केले तर सूत्रसंचालन ओमकार देवरे यांनी केले.
नवनिर्वाचित महानगर कार्यकारिणी
महानगर अध्यक्षा :- प्रा.डॉ.योगिता पाटील
महानगर उपाध्यक्ष :- प्रा.गोपाल बल्लोच
महानगर मंत्री :- नागेश गलांडे
महानगर सहमंत्री :- स्नेहा पारीक, ऋषिकेश केकान, दीपक टोनपे
Tsvk संयोजक :- पृथ्वी तीलवलकर
व्यवस्था प्रमुख :- प्रा गुरुबस्सपा करपे
सहव्यवस्था प्रमुख :- सुनील जाधव
सदस्य - निकेतन कोठारी,उमाकांत पांचाळ, श्रीनाथ देशपांडे,अश्विन सुरवाडे,सचिन लांबूटे
छत्रपती शिवाजी महाराज नगर (मध्य भाग)
नगर अध्यक्ष :- प्रा.दया पाटील
नगर उपाध्यक्षा :- प्रा भाग्यश्री सानप
नगर मंत्री :- मयूर काथार
सहमंत्री:-सोनल जाधव
सहमंत्री:-शुभम सिरसाट
सोशल मीडिया संयोजक :- सुमेध मनूरकर
SFS संयोजक :- शुभम मेश्राम
सदस्य:- प्रा गजानन सर्वज्ञ,सिद्धेश्वर लटपटे
स्वामी विवेकानंद नगर (सिडको भाग)
अध्यक्ष - प्रा.जयश्री चव्हाण
मंत्री - कृष्णा पवार
सहमंत्री - ओमकार देवरे, ऋद्रेश देशमुख
राष्ट्रीय कलामंच संयोजक - पंकज अडे
फार्माव्हिजन संयोजक - ओमकार कलवले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर (वाळूज भाग)
अध्यक्ष - प्रा.रमेश जायभाये
मंत्री - आश्विनी वनारसे
सहमंत्री - सतीश बडे
SFD संयोजक - सागर जाधव
SFS संयोजक - करण अहिरे
फार्माव्हिजन संयोजक - योगेश वराडे
फार्माव्हिजन सहसंयोजक - प्रथमेश मरमठ
सोशल मीडिया संयोजक - ओमकार कुटे