बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी
कर्नाटक : कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला. बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला.पावागडामध्ये झालेल्या या अपघातात २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये ६० हून अधिक लोक प्रवास करत होते.
बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने हॉ़स्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाय. एन. होसाकोटे ते पावगडा या खासगी बसमधून 30 हून अधिक जण प्रवास करत होते. यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. ही बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. यात अनेक प्रवासी बसले होते. पल्लवल्ली डायव्हर्शन येथील दुर्घटनेमुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मृतांमध्ये बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचंही सांगण्यात येतंय. जखमींना पावागडा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्याच आठवड्यात राज्यातील कलबुर्गी इथंही एक रस्ता अपघात झाला होता. त्यात बलुरागी गावाजवळ कार झाडावर आदळली होती. त्यादरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांची ओळख पटल्याची माहिती दिली होती. यातील सर्व मृत महाराष्ट्रातील अहमदनगरमधील रहिवासी होते.