मराठवाड्यातील तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

औरंगाबाद /प्रतिनिधी - विवेकानंद महाविद्यालयामध्ये रोजगार मेळावा
जिल्हाधिकारी व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र आणि विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ,औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने आज  विवेकानंद कला,सरदार दलीपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,औरंगाबाद येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पारपडला.         

या रोजगारभिमुख कार्यक्रमाकरिता औरंगाबाद शहरामधील विविध कंपन्यांमध्ये कुशल तथा अकुशल 251 पद हे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरले जाणार आहेत.या रोजगार मेळाव्याकरिता मॅन एनर्जी सोल्युशन इंडिया प्रा.लि.औरंगाबाद, पॅरासन मशिनरी (१) प्रा.लि.औरंगाबाद,मायलन लॅबोरॅटरीज ,औरंगाबाद, फोबर्स अंड कंपनी लि.औरंगाबाद, कॉस्मो फिल्म लि.औरंगाबाद,पगारिया ऑटो प्रा.लि.औरंगाबाद, कॅन पॅक इंडिया प्रा.लि.औरंगाबाद,नवभारत फर्टिलायजर लि.औरंगाबाद, मराठवाडा ऑटो कॉम प्रा.लि.औरंगाबाद आणि पित्ती इंजिनिअरिंग लि.औरंगाबाद या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे अहर्ता प्राप्त तरुणांची कौशल्य आधारित विविध पदांकरिता निवड करणार आहेत.

            या रोजगारभिमुख कार्यक्रमाकरिता औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा.श्री.सुनील चव्हाण (भा.प्र.से.) उपस्थित राहून युवा वर्गाला विशेष मार्गदर्शन करणार आहेत.तसेच या रोजगारभिमुख कार्यक्रमाकरिता सुरेश वराडे,सहाय्यक आयुक्त ,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,औरंगाबाद आणि सुनील सौंदाणे,उपआयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,औरंगाबाद उपस्थित राहणार आहेत.तरी युवा वर्गाने या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नि: शुल्क नाव नोंदणी करून प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या दिवशी स्वखर्चाने उपस्थित राहून मुलाखत संधीचा लाभ घ्यावा असे विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर डी.आर.शेंगुळे आणि विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. अशोक गायकवाड यांनी अवाहन केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा