मेलेला मुलगा तीन महिन्यांनी झाला जिवंत सावत्र बापाची विचित्र खेळी
वाळूज / प्रतिनिधी- भोळसर, मतिमंद असलेला मुलगा ओझे ठरत असल्याच्या भावनेतून सावत्र बापाने तो मुलगा करोनामुळे मृत झाल्याचे गावकऱ्यांना सागंत चक्क जिवंत मुलाचे सर्वच क्रियाकर्मही केले. मात्र तीन महिन्यांनंतर मृत सांगितलेला मुलगा परिसरातील तीन तरूणांना आढळला जिवंत. याप्रकाराने सावत्र बापाचा बनाव तीन महिन्यांनंतर झाला उघड.
रांजणगाव भागात राहात असलेल्या १७ वर्षीय भोळसर मुलाच्या आईने पहिल्या पतीचे निधन झाल्याने सहा वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले. दरम्यान मुलगा भोळसर असल्याने त्याला आयुष्यभर सांभाळावे लागेल या कारणावरून सावत्र बापाने त्याला सुमारे तीन महिन्यांपूर्वी दुचाकीवर घाटीच्या अपघात विभागासमोर नेऊन सोडले. त्यानंतर आठ दिवसांनी कोरोनात मुलाचे निधन झाले आहे. असे शेजारील नागरिकांना सांगून 'जिवंतपनीच मुलाचा दहावा' घातला.
तो भोळसर मुलगा सापडला
रांजणगाव भागात भोळसर मुलगा राहत असलेल्या परिसरात राहणारे हाफिज शेख, अमोल शेवनकर, शुभम दुसांगे हे १३ डिसेंबर रोजी कामानिमित्त घाटी रुग्णालयात गेले होते. त्या,वेळी त्यांना तो भोळसर मुलगा भिक्षा मागतांना दिसला. तिघांनी त्या भोळसर मुलाला घरी घेवून जाण्यायचा प्रयत्न केला, मात्र मला आई घेण्यासाठी येत असल्याचे सांगत त्याने त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला. रांजणगावत आल्यावर त्या तीन मुलांनी भोळसर मुलाच्या आई-वडीलांना मुलाबाबत सांगितले. मात्र सावत्र वडीलांनी मुलगा करोनाने मेला व त्याचे सर्व विधीही केल्याचे सांगत, घरात त्याचा हार घातलेला फोटोही दाखवला. याप्रकारणाने चिडलेल्या त्या तिघांनी सावत्र बापाचा भांडाफोड केला. त्या तरुणांना संशय आल्याने त्यांनी ही बाब परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तरुणांनी त्या भोळसर मुलाला सोबत घेत रांजणगाव गाठले. त्याच्यां घरासमोर भोसळर मुलाला उभे करुन हा मुलगा कोण आहे अशी विचारणा करताच त्या सावत्र बापाची भंबेरी उडाली. त्या तीन तरूणांनी त्या भोळसर मुलासह सावत्र बापाला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणले आणि घडलेला प्रकार ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्यासमोर सांगितला. त्यानंतर भोळसर मुलाच्या सावत्र बापाने चूक झाल्याचे मान्य करून क्षमा याचना केली व यापुढे त्या मुलाचा आयुष्यभर साभांळ करण्याचे वचन दिले. या सर्व प्रकरणानंतर त्या भोळसर मुलाला पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी नवीन कपडे घेऊन देण्यासाठी पैसेही दिले. त्यावेळी त्या भोळसर मतिमंद मुलाने पोलिस निरीक्षक गुरमे यांचेकडे पाहात जणू कृतज्ञतेचे भाव नजरेतून आणि हात जोडत व्यक्त केले.