टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात
मालेगाव /प्रतिनधी - मालेगाव चाळीसगाव मार्गावरून जाणाऱ्या टेम्पो चे अचानक ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला.टेम्पोमध्ये 20 ते 22 जण प्रवास करत होते. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून आणखी 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 6 वर पोहोचली असून 15 ते 18 जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव-चाळीसगाव मार्गावर आज संध्याकाळी हा अपघात घडला. चाळीसगाव येथील काही रहिवासी मालेगावमधील चंदनपुरी इथं टेम्पोने दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर सर्वजण चाळीसगावला जात होते.
या अपघातात लीलांबाई पाटील, कांतीलाल पाटील, बन्सीलाल पाटील आणि आबाजी पाटील अशी मृतांची नावं आहे. या अपघातात 15 ते 18 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.