विज्ञानाला आव्हान देणारी घटना वर्षाच्या लेकराला... होणार मूल
प्रेग्नन्सीचं धक्कादायक प्रकरण चर्चेत आलं आहे. अवघ्या एक वर्षांची चिमुकली प्रेग्नंट झाली आहे. त्यातही शॉकिंग म्हणजे पोटाऐवजी डोक्यात मूल वाढत होतं वर्षभराने मुलीचं डोकं फुग्यासारखं फुगलं. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या आईवडिलांसह पालकांनीही धक्का बसला. चीनमधील हे प्रकरण आहे. एक वर्षांची चिमुकली जिच्या डोक्यात एक मूल वाढत होतं.
तिच्या डोक्याचा आकार वाढत होता. तिला वस्तू पकडण्यात, बसण्यातही समस्या येत होती. त्यामुळे डॉक्टर तिला घेऊन रुग्णालयात पोहोचले. जेव्हा तिची तापसणी करण्यात आली तेव्हा तिच्या मेंदूत एक मूल असल्याचं दिसलं.हे मूल म्हणजे तिचं जुळं भावंडं होतं. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिच्यात तिचा जुळा भाऊ असेल याचा कुणी विचारही केला नव्हता. डॉक्टरनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाची कंबर, हाडं होती आणि बोटांवर नखंही आली होती.
जेव्हा चिमुकली आईच्या गर्भात होती तेव्हा या गर्भाचा विकास तिच्या मेंदूच्या आत होत होता. 4 इंचाचा हा गर्भ. याला वैद्यकीय भाषेत फिटस इन फिटू म्हणतात. गर्भात जुळी मुलं आपसात जुळली जातात.
काही प्रकरणात ते एकमेकांमध्ये सामावले जाताता. आतापर्यंत असे एकून २०० प्रकरणांची नोंद आहे. त्यापैकी 18 प्रकरणात एका बाळाला दुसऱ्या बाळाच्या डोक्यात वाढताना दिसलं आहे. इतर प्रकरणात हा गर्भ पोट, आतडे आणि तोंडातही दिसून आला आहे.
जेव्हा आयडेंटिकल ट्विन्स एकमेकांपासून नीट वेगळे होत नाहीत, तेव्हा असं होतं. एक भावंड दुसऱ्या भावंडाच्या शरीरात जातं आणि आणि तिथंच त्याची वाढ होते. डॉक्टरांनी हा जुळा गर्भ सर्जरी करून बाहेर काढला आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी जर्नलमध्ये या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे.