खाद्य तेलाचे भाव झाले कमी जाणून घ्या काय आहेत भाव

खाद्य तेलाचे भाव झाले कमी जाणून घ्या काय आहेत भाव

औरंगाबाद / प्रतिनिधी : रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीवर मोठे परिणाम झाले होते. परंतु आता तेलाचे भाव पंधरा ते वीस रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. रशियातून सूर्यफुलाच्या आयातीवर परिणाम झाल्याने तेलाच्या किमती वाढल्या होत्या.

मलेशियात पाम उत्पादन घटल्याने पाम तेलाच्या आयातीवर परिणाम झाला होता. ग्राहकांनी आगामी काळात तेलाच्या किमती वाढतील या विचारातून एक डबा तेलाची गरज असताना आता दोन-तीन डब्याचा स्टॉक केला आहे.

ग्राहकांनी आगामी काळात तेलाच्या किमती वाढतील या विचारातून आता तेल साठवणूक करू नये. एवढेच नव्हे तर शासनाने व्यापाऱ्यांवर तेलाचा स्टॉक करण्यावर डिसेंबरपर्यंत बंदी कायम ठेवली आहे ग्राहकांची संख्या घटल्याने तेलाचे दर 15 ते 20 रुपयांनी कमी झाल्याचे नवीन मोंड्यातील व्यापारी बबन चुडीवाल यांनी सांगितले.


तेलाचे भाव (प्रती लिटर)
सूर्यफूल 165 रुपये, पाम तेल 145 रुपये, सोयाबीन 156 ते 164 रुपये, शेंगदाणा 165 ते 170 रुपये

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा