लसीकरण मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

लसीकरण मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद/प्रतिनिधी - महानगरपालिका आरोग्य विभागाच्या  वतीनं घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आसून 6 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान 4 लाखांपेक्षा अधिक  नागरिकांनी डोस घेतला आहे. अद्दाप  2 लाख 24 हजार  लोकांच लसीकरण बाकी असल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्दकिय  अधिकारी डॉ पारस मांडलेचा यांनी दिली.

औरंगाबाद जिह्यातील लसीकरणाची संख्या खूप कमी असल्याने केंद्र व राज्य शासनाने बैठक घेउन मनपा जिल्हा व आरोग्य प्रशासनास सुनावले होते आणि मोठया प्रमाणात लसीकरणाची गती वाढण्याची आदेशित केले होते.या प्रमाणे मनपा प्रशासनाने विविध प्रकारे नागरिकांत जनजागृती करून अनेक भागात मेघा लसीकरण शिबीर आयोजित केले, या मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत गेल्या महिन्याभरात 6 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान जवळपास  4 लाख 3 हजार 625 नागरिकांनी डोस  घेतला आहे.
मनपा चे शहरात एकूण 10 लाखाचे उद्धिष्ट आसून आजपर्यंत  8 लाख 30 हजार 822 जणांनी पहिला डोस  तर 4 लाख 57 हजार 712 जणांनी दुसरा डोस घेतला आहे,यात आणखी 2 लाख 24 हजार बाकी आहेत, आज पर्यंत शहरात लसीकरण ची सरासरी 43% झाली आसल्याची माहिती आरोग्य वैद्दकिय अधिकारी डॉ पारस मांडलेचा यांनी दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा