अनियमित पाणी पुरवठा विरोधात संतप्त महिलांचे ठिय्या आंदोलन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद/ प्रतिनिधी- एन 7 सिडको परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने संतप्त नागरिकांनी एन 7 येथील पाणी पुरवठा कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करत मनपा अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त केला.

गेल्या वर्षभरापासून सिडको एन 7 परिसरातील विविध भागात महानगरपालिका  पाणी पुरवठा विभाग 5 ते 6 दिवसा नंतर सप्लाय करत आहे. यात तांत्रिक अडचण किंवा प्रेशर ने पाणी येत नसल्याने महिन्यातून काही दिवस पाणी पुरवठा खंडीत केला जातो.यात काही भागात जलवाहिनी दुरुस्तीसाठी रस्ते खोदून ठेवले असून,मनपा अधिकारी जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये वाद निर्माण करून आपसात भांडण लावत असल्याचा ही आरोप आंदोलन कर्त्या नागरिकांनी केला.
आज दि. 20 जानेवारी रोजी सकाळी संतप्त महिला व नागरिक अनियमित  पाण्याविषयी जाब विचारण्या करिता महिला नागरिक हांडे घेउन सरळ  मनपाचे एन 7 येथील पाणी पुरवठा कार्यलयावर धडकले. पण कार्यालयात वरिष्ठ अधिकारी नसल्याने आंदोलन कर्त्या महिलांनी कार्यलया समोरच हांडे वाजवून ठिय्या आंदोलन करत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
माजी नगरसेवक शिवाजी दांडगे यांचा नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी नागरिकां विरोधात मनपा प्रशासन  गुन्हे दाखल करतात तसे आम्ही मनपा अधिकाऱ्यांवर रीतसर गुन्हे दाखल करणार असून,येत्या 2 दिवसात सप्लाय सुरळीत न झाल्यास आणखी  तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी दांडगे यांनी दिला.

मनपा वरिष्ठ अधिकारी यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वसन दिल्यानंतर सदर आंदोलन माघे घेण्यात आले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा