खासगी बस दरीत कोसळून 7 ठार

नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे 5 वाजेच्या सुमारास खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिक-गुजरात महामार्गावर खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात खासगी बस दरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. जमखींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.