वाळूज औद्योगिकनगरीत अवैध गॅस रिफिलिंग सेटरवर धाड

वाळूज औद्योगिकनगरीत अवैध गॅस रिफिलिंग सेटरवर धाड

औरंगाबाद/ प्रतिनिधी
वाळूज औद्यागिक परीसरातील कामगार चौकात विनापरवाना अवैधपणे सर्वाच्या नाकावर टिच्चून घरघुती वारण्यात येणारे गॅस सिलींडर रिक्षात भरण्याचा गोरख धंदा सुरू असल्याची माहीती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीसांनी पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकुन  सहा जणासह साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई पोलीसांनी केल्याची घटना समोर आली आहे.


      वाळूज औद्योगिक परीसरातील कामगार चौकालगत असलेल्या गिरीराज हौसिंग सोसायटीमध्ये अवैधपणे गॅस रिफिलींग सेंटर  सुरू असल्याची माहीती मिळातच वाळूज एमआयडीसी पोलीसांनी पुरवठा विभागाला त्याची माहीती दिली पुरवठा विभागाचे अधिकारी अनुराधा बळीराम पाटील  आणि पोलीसांच्या पथकाने ७ वाजेच्या सुमारास छापा मारला असता त्या ठिकाणी दोन आटो रिक्षा, पाच भरलेले गॅस सिलेडर, ३५ रिकामे गॅस सिलेडर आणि गॅस सिलेडरमधून रिक्षात गॅस भरण्यासाठी वापरत असलेल्या दोन मोटारी आणि वजन काटे असा मुद्देमाल पोलीसांना मिळून आला तसेच या ठिकाणी या सेंटरचे मालक शेख लतिफ शेख मुसा आणि बिलाल शेख जलाल तसेच या ठिकाणी काम करणारे कर्मचारी हिदायतखान खलील खान, अफजरखान मुजाहिदखान, कृष्णा म्हस्के, शेख फईम अमिर यांना पोलीसांनी ताब्यात घेवून  त्याच्याविरूध्द  वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.     ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता पोनि संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि तथा डीबी पथकप्रमुख चेतन ओगले, पोलीस कर्मचारी प्रकाश गायकवाड, अविनाश ढगे, भिसे आणि वाहन चालक शरद वेताळ आदीच्या पथकाने केली़.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा