त्या अपघातातील दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू
गंगापूर/ प्रतिनिधी- गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ कोर्टासमोर टेम्पोने फूटपाथवरी नागरिकांसह मोटारसायकलला उडवले. यात पाच नागरीक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नुकताच घडली.
अपघातातील दुसरा जखमी विनोद शिंदे याचा २५ मार्च रोजी उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ कोर्टाच्या समोर एम एच १७ के ७८९३ क्रमांकांच्या खडीच्या टॅम्पोने ११ मार्च रोजी दुपारी दिड वाजता भरधाव वेगाने येवून रोडच्या बाजूला लावलेल्या मोटारसायकली व फुटपाथवरील पाच सहा नागरिकांना उडवले. या अपघातात चार मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये गंगापूर येथील बुलढाणा बॅंकेचे व्यवस्थापक अनंत पिसाट (५८) ,विनोद काशीनाथ शिंदे(२८,रा. पिंपरखेडा), फातमाबी अमीन पटेल (६५ रा. गंगापूर )व अमोल एकनाथ कनगरे (२६, रा. नेवरगांव) हे गंभीर जखमी झाले होते. यातील फातमाबी अमीन पटेल (६५, रा. गंगापूर )यांचे तिसऱ्या दिवशी निधन झाले होते. विनोद शिंदे यांच्या पाय व डोक्याला मार लागल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी १९ मार्च रोजी विनोद याला जालना रोडवरील जे जे पल्स हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान विनोद शिंदे याचे २५ मार्च रोजी निधन झाले.