वडगाव कोल्हाटी रोडवर भीषण अपघात
औरंगाबाद/ प्रतिनिधी - औरंगाबाद तालुक्यांतील वडगांव कोल्हाटी छत्रपती नगर रोडवर नुकताच भीषण अपघात झाल्याचे धक्कादायकृत नुकताच समोर आले आहे.
एक वयस्कर व्यक्ती व दुचाकीस्वार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने वृद्ध व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागून ते बेशुद्ध झाले आहेत. अपघाताचे मुख्य कारण म्हणजे तेथूनच काही अंतरावर असलेले विजेच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉट सर्किट होऊन विजेच्या तारांचा मोठा आवाज झाला या आवाजाला घाबरून दुचाकी स्वार वृद्ध व्यक्तीची धडक झाल्याचे समजते. यावेळेस व्यक्तीची व दुचाकीस्वरची धडक झाल्याने अपघात झाला.
घटनेचे वृत्त कळताच सामाजिक कार्यकर्ते अशोक निकम, सतीश पाटील, ज्ञानेश्वर भोईगिर, भाजपाचे नेते अनिल चोरडिया यांनी घटनास्थळी धाव घेऊन वृद्ध जखमी व्यक्तीला येथील स्थानिकांच्या मदतीने तात्काळ इस्पितळात दाखल केले.