गुंठेवारी अंतर्गत येणाऱ्या मालमत्ता नियमितीकरणासाठी मुदतवाढ
औरंगाबाद/ प्रतिनिधी - गुंठेवारी कायद्या अंतर्गत घरांना नियमीत करणासाठी महापालिकेने यापूर्वी ३० ऑक्टोंबर पर्यंत मुदत दिली होती़ परंतु आता पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार यामध्ये ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे.
गुंठेवारी कायद्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच मालमत्ता धारकांनी आपले घर,दुकान यांचे नियमितीकरण ३०
ऑक्टोंबर पर्यंत करून घ्यावे असे आदेश महापालिकेकडून देण्यात आले होते़ परंतू पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार यामध्ये ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे व तीचा लाभ घेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या मालमत्तेचे नियमितीकरण करावे असे आवाहन मनपा प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.