महानगरपालिका आयुक्त यांचे नवे आदेश
औरंगाबाद /प्रतिनिधी - सिद्धार्थ उद्यान येथील पार्किंगची जागेची साफसफाई आणि डागडुजी करून घेण्याचे आदेश आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिले.
आज सकाळी दहा वाजता प्रशासक महोदयांनी सिद्धार्थ उद्यान येथे बीओ टी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या दुकानांची व उद्यानाच्या पार्किंगची देखील पाहणी केली आणि याची साफसफाई व डागडुजी करून घेण्याचे आदेश दिले.
सिद्धार्थ उद्यान बीओटी प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी वेगळी बैठक लावण्याची निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी शहर अभियंता एबी देशमुख, उप आयुक्त अपर्णा थेटे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, उप अभियंता रामदासी व प्रकल्पाची पीएमसी चे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
G-20 परिषदानिमित दुभाजक आणि शहरातील मुख्य रस्ते तसेच दर्शीनी भाग सुशोभित आणि सुंदर दिसावे यासाठी झाडे लावण्यासाठी उद्यान विभागाने कुंड्या मागवल्या आहेत. आलेल्या कुंड्यांची पाहणी देखील यावेळी प्रशासकानी केली.