"५००१ वृक्ष लागवडीचा संकल्प" कार्यक्रमाचे उदघाटन
औरंगाबाद /प्रतिनिधी - गड किल्ले जतन संवर्धन संस्था देवगरीयन ट्रेकर्स व परभणी जिल्हा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबर रोजी तिरुपती एस टी वर्कशॉप चिकलठाण येथें ५००१ वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या डॉक्टर, उद्योजक, शिक्षक यांचे सत्कार करण्यात आले. या संस्थेने २४ वर्षांपासून ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरनाशी निगडित वृक्ष लागवड असे कार्य केले आहे.संस्थेत आजी माजी प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, उद्योजक हे मिळून राबत आहेत. संस्थेचे उद्धिष्ट वृक्ष लागवड करण्या बरोबर त्यांचे संगोपन करणे हे देखील आहे.
<span;>यावेळी अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सचिव पंडीत श्रीसागर, राजू शिंदे, प्रा संभाजी कमानदार, प्रा राजेश विटेकर, राजेश गोरेगावकर,डॉ अजित गोपछडे, ऍड सुरेश मुंढे,आजी माजी शिक्षक, विद्यार्थी, व पर्यावरण प्रेमी उपस्थित होतेे.