आता अनाधिकृत नळ जोडणे होणार कठीण
औरंगाबाद/ प्रतिनिधी - शहरातील पाणी पुरवठा सुधारणा संदर्भात पाणी पुरवठा सुधारणेचा एक भाग म्हणून अनाधिकृत नळ जोडणीला कोणत्याही नागरिकांना मदत करणार नाही, शहरात कोठे अनाधिकृत नळजोडणी होत असेल तर त्याची तत्काळ माहिती महापालिका पाणी पुरवठा दिली जाईल,असे प्लंबर , पाणी पुरवठा ठेकेदार यांनी सांगितले.
महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली डॉ मौलाना अबुल कलाम संशोधन केंद्र येथे आज गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा सुधारणा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या झालेल्या बैठकीत महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी,
कर्मचारी, प्लंबर, पाणी पुरवठा ठेकेदार यांनी शहरातील पाणी पुरवठा सुधारणा संदर्भात सविस्तर चर्चा केली.पाणी पुरवठा सुधारणा बाबत काय काय उपाय योजना करता येतील, पाण्याचा गैरप्रकार वापर व अपव्यय, अनाधिकृत नळ जोडणी करणार्याविरुद्ध कारवाई करणे, अनाधिकृत नळजोडणी करणाऱ्या नागरिकांना मदत न करण्याचे आवाहन महानगरपालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी केले.याबाबत प्लंबर यांच्या वतीने सांगण्यात आले की, अनाधिकृत नळ जोडणी करणार्यांना मदत करणार नाही, कोणी करत असेल तर त्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कळविण्यात येईल.पाणी पुरवठा सुधारणेच्या उपाय योजनाचा हा एक भाग आहे.असल्याचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले. या बैठकीला मुख्य लेखाधिकारी वाहुळे, उपायुक्त टेंगळे,उप अभियंता पद्मे, मोरे, फालक प्लंबर, पाणी पुरवठा ठेकेदार, पाणीपुरवठा कर्मचारी अधिकारी आदी उपस्थित होते.