जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या मानद अध्यक्षपदी बळीराम राठोड
औरंगाबाद /प्रतिनिधी - ग्रामसेवक संघटनेची त्रैमासिक सभा जिल्हाध्यक्ष भीमराज दाणे यांच्या अध्यक्षतेखाली प.स. सभागृहात नुकताच पार पडली. या सभेत जिल्हा ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी ग्राम विकास अधिकारी वळदगाव बळीराम राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या कार्यकारणीत उपाध्यक्षपदी प्रल्हाद रिंढे, जिल्हा सहसचिव म्हणून किशोर जाधव, महिला संघटक कविता भुजाडे, प्रसिद्धीप्रमुख श्रीकांत पाटील,कायदे सहसल्लागार म्हणून ए. सी.पटेल, निमंत्रीत सदस्य म्हणून गंगाधर गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी राज्य कायदे शिवाजी सोनवणे, जिल्हा सरचिटणीस प्रवीण नलावडे, कार्याध्यक्ष सुरेश कळवणे, जिल्हा कोषाध्यक्ष बनसोड बापू, कौन्सिलर राधाकिशन चौधरी पतसंस्था सचिव सागर डोईफोडे, सचिव रवी नाईक,ए. के. आहेर, सुनील ढाकरे, अरुण दळवी सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.