राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उदघाटन संपन्न
सिल्लोड /प्रतिनिधी - श्री.बालाजी हॉस्पिटल सिल्लोड तसेच सेठ नंदलाल धुत हॉस्पिटल औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिल्लोड येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. याशिबिरात 200 हुन अधिक रुग्णाची तपासणी करण्यात आली.
राज्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी अर्थसंकल्पात 5 हजार कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. सर्व सामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत राज्य शासनाने अनेक आजाराचा समावेश केला आहे.त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना स्वतःहून शासकीय योजनेची माहिती रुग्णालयाने दिली पाहिजे असे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्वरोग निदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले. डॉक्टरांनी उपचारसोबत रुग्णांना धैर्य देण्याचे काम केले पाहिजे अशी भावना देखील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, शिवसेना विधानसभा संघटक सुदर्शन अग्रवाल, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर धुत हॉस्पिटलचे डॉ. वरून गवळी, डॉ. लीना झलवार, डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. आर.एन.झलवार, डॉ. भाऊसाहेब गोंगे, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, आसिफ बागवान , मनोज झंवर, सत्तार हुसेन, बापू काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.