घंटागाडीवरील सफाई कामगारांच्या न्याय्य लढ्यास आयटक चा पाठींबा

घंटागाडीवरील सफाई कामगारांच्या न्याय्य लढ्यास आयटक चा पाठींबा

औरंगाबाद / प्रतिनिधी -  औरंगाबादकरांच्या दारात येऊन केर, कचरा, घाण विना तक्रार घेऊन जाणार्या मनपा औरंगाबादच्या  घंटागाडीवरील कथित कंञाटी कामगारांवर कीमान वेतनासाठी  पुन्हा आंदोलनाची वेळ आली. त्यास महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे पाठींबा देण्यात आला आहे.

याबाबत  असे की, महानगरपालिका औरंगाबाद तर्फे रोज सकाळीच आपल्या दारात घंटा गाडी आली हो म्हणत केर कचरा घाण नेणारे सफाई कामगारांचे शोषण गेल्या अनेक वर्षांपासुन सुरु आहे. सेवेत सामावून घेने तर सोडा वेळेवर वेतन आणि तेही शासनाने ठरवून दिलेले कीमान वेतन सुद्धा दिले जात नाही. याविरोधात त्यांनी आजपासून 3 दिवसांचे रजा आंदोलन पुकारले आहे. अनेकदा निवेदने देऊनही मनपा लक्ष देत नाही, कोरोना काळात जोखीम पत्करून अत्यंत महत्वपूर्ण काम त्यांनी केले म्हणुन नाईलाजास्तव सामुहिक रजा आंदोलन करावे लागत आहे. लोकांना मुद्दामहून ञास देण्याचा हेतु नाही अस त्यांच म्हणण आहे. भातृभाव म्हणुन महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक ने तर्फे संघटक काॅ राजु हिवराळे यांनी पाठींब्याचे पञ दिले. यावर संघटनेचे राज्य सेक्रेटरी काॅ.ॲड. अभय टाकसाळ यांचीही सही आहे. कारभारी जाधव , सचिन निकाळजे , सुनिल हरिश्चंद्र निर्मळ , प्रमुख कार्यकर्ता कामगार शक्ती संघटना मनपा औरंगाबाद यांना हे पञ देण्यात आले . या पञात  आजपासुन चे 3 दिवस रजेचे आंदोलनाची बातमी बघीतली. महाराष्ट्र कर्मचारी संघटना संलग्न आयटक या पञाद्वारे आपल्या आंदोलनाला पाठींबा देत आहे. कीमान वेतन मिळालेच पाहिजे.  सर्व कथित ठेकेदारी कामगारांनी एकजूटीने होणाऱ्या शोषणा विरोधात संघर्ष करायला हवा.  आम्ही आपल्या सोबत आहोत. कोणत्याही स्वरुपाची रास्त मदत आमच्या क्षमतेनुसार आम्ही आपणांस करुत.  असे पञात नमुद आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा