अगरवाडगाव  येथे १००० लिटर चा आरो प्लांट

अगरवाडगाव  येथे १००० लिटर चा आरो प्लांट

औरंगाबाद / प्रतिनिधी -   शासन आपल्या दारी या मोहीमे अंतर्गत ग्रामपंचायत अगरवाडगाव यांनी लोकांना गावाच्या विकासासाठी जी कामे करण्याचे वचन दिले होते ते पूर्ण केले. यामध्ये प्रामुख्याने  धनगरपट्टी येथे १००० लिटर शुद्ध पाण्याच्या आरो प्लांट चे उदघाटन करण्यात आले.  येथिल स्मशानभूमीत पेवर ब्लाॅक बसविण्यात आले तसेच अगरवाडगाव शाळेत वाॅटर कुलर   देण्यात आले. या वेळी उपसभापती सुमित मुंदडा, सरपंच भाऊसाहेब भाऊ नवरंगे व उपसरपंच  अशोक भाऊ म्हसरूप, ग्रा म . सदस्य बाळु काका बोकडिया, माजी सरपंच काकासाहेब म्हसरूप, आयुब भाई शेख, लतीप भाई पठाण, बाळु भाऊ वाघ व ग्रामस्थांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा