वाल्मीक कराड अखेर सीआयडी ला शरण

प्रतिनिधी - गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेले वाल्मीक कराड यांच्या अटकेचे नाट्य आज संपले. संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी दोषी ठरलेले वाल्मीक कराड आज सीआयडीला शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी आपला एक व्हिडिओ जाहीर केला. त्यात त्यांनी मी दोषी असेल तर मला जी शिक्षा मिळेल ती मला मान्य आहे असे नमूद केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आहेत.
यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सीआयडीतील सूत्रांनी दिली. वाल्मीक कराड आजच शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच सीआयडीच्या कार्यालयासमोर गर्दी झाली होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिक कराडवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा