अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांचे ग्रीन सिग्नल

अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांचे ग्रीन सिग्नल

औरंगाबाद/प्रतिनिधी - अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देत असताना  पोलिसांनी 16 अटी शर्ती लावल्या आहेत. यातील मुख्य म्हणजे या सभेसाठी साडे चार ते रात्री पावणे दहा पर्यंत चा वेळ देण्यात आला असून  वंश, जात, भाषा आणि वर्ण या विषयावर कुणीही टिपणी करू नये असे आदेशित करण्यात आले आहे.  15 हजार लोकांपेक्षा जास्त जणांना  सभेत आमंत्रित करू नये असे देखील  पोलिसांनी सांगितले आहे. 
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहिर सभा सांस्कृतीक क्रिडा मंडळ मैदान, खडकेश्वर येथे होणार आहे.
१) कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये.

२. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळी सभेला येतांना व परत जातांना कोणोही आक्षेपार्ह घोषणा, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेसाठी बोलावलेल्या सर्वांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या त्या वाहनांनी शहरात शहरा चार प्रवासादरम्यान त्या त्या रस्त्यावर विहोत वेगमर्यादेचे पालन कराये सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन) पाकोगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकोग करण्याच्या सुचना द्याव्यात. 
३) सभेसाठी येताना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रैलो काढू नये. त्याच प्रमाणे  राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असुन आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून परत जाण्याच्या खेळी कोणतोही रैलो काढू नये.

४) कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये अगर प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदोचा भंग करु नये अट क्र. २,३.४ यावत समेत सहभागी होणान्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.

६) सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या चाहेरून निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरून संख्या, त्यांचा येण्याचा य जाण्याचा मार्ग येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटोचीफ यांचे कडे द्याथी
७) सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतकी असल्यामुळे त्याठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकलो, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल, 
८) सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशांत केलेल्या ठिकाणी मजबूत बॅरोकेटस उभारावे. सभेसाठी येणान्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य तो तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलीसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
९) सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा