ट्रेलर आणि कारची धडक ५ भाविकांचा जागीच मृत्यू

जयपुर बायपास वर ट्रेलर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. प्रयागराजमधील महाकुंभावरून परतताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाकुंभात पवित्र स्नान करून परतताना भाविकांची कार उभ्या ट्रेलरला धडकली. टक्कर एवढी भीषण होती की, कारच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. या भीषण अपघातानंतर भाविकांचा एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात दोन दाम्पत्यांसहित पाच जणांचा मृत्यू झाला असून अपघातग्रस्त टोंक जिल्ह्याच्या दवेली येथे राहणारे आहेत.

अपघातात ५ जणांचा मृत्यू
भीषण अपघातात मुकुट बिहारी सोनी, त्याची पत्नी गुड्डी देवी, राकेश सोनी आणि त्याची पत्नी निधी, कार चालक नफीस खान यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील दीपेश सोनी, ट्रेलर चालक धर्मवीर, मिस्त्री रामचरण जखमी झाले. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघातानंतर पोलीस सतर्क झाले. गॅस लीक होण्याच्या भीतीने वाहतूक रोखण्यात आली. पोलिसांनी अपघातानंतर दुर्घटनाग्रस्त वाहनांना एका बाजूला ठेवून वाहतूक सुरु ठेवली. दौसा जिल्ह्यातील रुग्णालयात ५ जणांच्या मृतदेहाची पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दौसाचे डीएसपी रवी शर्मासहित इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपघाताचं कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

धाराशिवातील अपघातात तिघांचा मृत्यू
धाराशिवातील उमरगा तालुक्यातील माडज पाटी येथे पिकअप आणि मोटर सायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दिंगबर कांबळे, आकाश रामपुरे, दीपक रामपुरे यांचा मृत्यू झाला आहे.


आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा