मित्रानेच केला मित्राचा घात

मित्रानेच केला मित्राचा घात
धर्माबाद : एकमेकांच्या शाब्दिक बाचाबाची वरुन रागाच्या भरात मित्राने मित्राचाच दि.२ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास दगडाने ठेचून खून केला असल्याने धर्माबाद शहरात खळबळ उडाली आहे. हि घटना शहरातील उर्दु स्कुल च्या पाठीमागे मोकळ्या जागेत घडली. आरोपीला त्याच रात्री गुन्हा घडल्याच्या दोन तासानंतर पोलिसांनी अटक केली असून खुन का ? केला याचे अद्याप कारण पोलीस तपासणी करीत आहेत. धर्माबाद शहरातील सरस्वती नगर येथील रहिवासी असलेले दोन मित्र क्रांती बन्सी उबाळे ( वय २८ रा. सरस्वती नगर धर्माबाद) व सचिन उत्तम कांचने( वय २३ रा.सरस्वतीनगर धर्माबाद) हे दोघे शहरातील उर्दु शाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेत रात्री बसले होते.काही कारणावरून दोघात शाब्दिक वाद झाला.सचिन कांचने यांने रागाच्या भरात क्रांती उबाळे यांच्या डोक्यात दगडाने ठेचून खून केला.खुनाचे कारण समजले नाही पण दोघे दारू पित बसले होते, दारू च्या नशेत बाचाबाची वरुन खुन करण्यात आला असे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. आरोपी सचिन काचने याने खुन करुन पळाला तेव्हा काही नागरिकांनी पोलिसांना कळविले .लगेच पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्याच रात्री आरोपीचा शोध घेतला व दोन तासात आरोपी सचिन काचने यास त्याच्याच घराच्या पाठीमागे गोठ्यात लपुन बसला होता त्यालाअटक करण्यातआले.त्याला ताब्यात घेऊन खाकी चौकशी केली असता आरोपीने खुन केल्याचे कबूल केले. मयताची मावशी रा.सरस्वतीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन उत्तम कांचने यांच्या वर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते करित आहेत. धर्माबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कते हे कडक व शिस्तबध्द अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत. घटनेची प्राथमिक माहिती मिळताच तपासाची चक्रे वेगाने फिरवीत दोन तासात आरोपीला त्यांनी अटक केली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा