नाचुन नाही तर वाचुन करणार भिमजयंती साजरी

नाचुन नाही तर वाचुन करणार भिमजयंती साजरी

औरंगाबाद /प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादुत विद्याश्री दाभाडे (सदाशिवे) यांनी रमानगर येथील महामाया बौद्ध विहार येथे या उपक्रमाचे आयोजन केले .
विश्वरत्न,महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त 6 तास वाचनाच्या उपक्रमाची संकल्पना दाभाडे यांनी महिलांना समजावुन सांगितली.परमपुज्य डाँ. बाबासाहेबांचे महिलांच्या हक्क,अधिकार व सामाजिक स्थिती सुधारण्यात किती महत्वाचे योगदान आहे. खरं तर अखिल महिला मग ती कोणत्याही समाजातील असो त्यांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय जीवनाचा दर्जा सुधारण्यावर बाबासाहेबांचे लाखो उपकार आहेत. त्या उपकांची परतफेड शक्य नाही . परंतु त्यांच्यासारखे महामानव जन्मी यावेत या साठी महिला हि सक्षम ,संस्कारी व वैचारीक बुद्धीची असावी यासाठी वाचन आवश्यक आहे . बाबासाहेबांनी दिलेल्या महान संदेशांपैकी - "पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होतं,आणि मस्तक तयार झालं तर शिकलेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही". बाबासाहेबांचे विचार वाचुन प्रत्यक्षात जीवनात उतरवण्यात , त्याचे अनुकरन करून जयंती साजरी करणार असा संदेश देत महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या वर्षी जरी कमी संख्येत हा उपक्रम घेतला तरी पुढील वर्षी यात जास्तीत जास्त महिला व पुरूष सहभागी होतील असा निर्धार स्थांनिक महिलांनी केला. विशेष म्हणजे यात एका 80 वर्षाच्या सत्यभामा मगरे या आजी सुद्धा विना चष्म्याच्या वाचनास बसल्या होत्या . त्यांना वाचतांना पाहुन दुसऱ्या महिलांना वाचण्याची प्रेरणा मिळाली . यात रमानगर येथील सक्रिय संघमिञा महिला बचट गटातील महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा