आधीच उकाडा त्यात पाणी प्रश्न गंभीर भाजपा व मनसे कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
औरंगाबाद /प्रतिनिधी- तापमान 40 अंशावर गेल्यामुळे आधीच नागरिक त्रस्त असताना त्यात पाण्याच्या प्रश्नाने औरंगाबादकर हैराण झाले आहेत. नागरिक या गैरसोयी साठी महापालिकेला सर्वस्वी दोषी ठरवत आहेत. सिडको हडको परिसरात विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठा च्या विरोधात नागरिकांसह भाजपा व मनसे कार्यकर्त्यांच ठिय्या आंदोलन
गेल्या अनेक महिन्यापासून सिडको हडको परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आसून ,याविषयी आंदोलन करून सुध्दा अनियमित पुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांच्या वतीने शुक्रवारी मनपा एन 7 कार्यलया समोर ठिय्या जणआक्रोश आंदोलन करण्यात आले.
एन 5 जलकुंभ व एन 7 जलकुंभा वरून सिडको व हडको भागात एक्सप्रेस जलवाहिनी वरून पाणी पुरवठा केला जातो.गेल्या अनेक महिन्यापासून या परिसरात पूर्णतः पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सतत अनियमित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.या विषयी गेल्या महिन्या पूर्वी भाजपा आमदार अतुल सावे यांच्या मार्गदर्शना खाली भाजपा व सिडको वासीयनी
एन 7 जलकुंभा आणि मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी आक्रमक ठिय्या आंदोलन केले होते. या वेळी प्रशासाने कार्यकर्त्यां वर गुन्हे दाखल झाले होते आणि तेव्हा आयुक्त पांडये यांनी 15 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पाणी पुरवठा सुरळीत तर झाला नाही ,पण उलट आता पाणी 8 व्या 9 व्या दिवशी येत आहे.
या मुळे या भागातील नागरिकात मनपा प्रशासनाच्या विरोधात जणआक्रोश पसरला आहे आणि लोकं संतप्त झाले आहेत.या कारणाने शुक्रवारी भाजपा व मनसे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने सिडको एन 7 पाणी पुरवठा कार्यलया समोर ठिय्या आंदोलन केले आणि जो पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करत नाही तो पर्यंत आंदोलन माघे घेणार नाही ,अशी आक्रमक भूमिका घेतली.
<span;>या वेळी आंदोकन कर्त्यानी मनपा प्रशासन व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्युक्त केला. पेया आंदोलनात भाजपा शहर अध्यक्ष संजय केनेकर ,नगरसेवक राजगौरव वानखडे ,शिवाजी दाडगे ,नितीन चित्ते ,महेश मावतकर ,ऍड माधुरी अदवन्त ,मनसे चे सुमित खांबेकर ,सह भाजप व मनसे कार्यकर्ते आणि सिडको ह्दकॉ येथील नागरिकाची मोठया संख्येने उपस्थिती होती. या आंदोलन वेळी पोलीसाचा मोठा बंदोबस्त होता .