मिलिंद कला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मिलिंद कला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राच्या संचालिका डॉ. अश्विनी मोरे या उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. 

जयंती कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला.आरंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डॉ. संतोष बुरुकुल यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संगीता दोंदे यांनी केले तर आभार  प्रा. शारदा बाचलकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा