कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
चंद्रपूर/ प्रतिनिधी- कंटेनरमध्ये <span;>कत्तलीसाठी<span;> जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून येणारी दोन वाहने तालुक्यातील टेकाडी गावाजवळ जप्त करण्यात आली. यावेळी पाच तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनातून ४८ जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे मोठ्या प्रमाणात नेण्यात येतात. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या बाराचाकी वाहनात जनावरे निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जाते.
जनावरांची तस्करी करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. याबाबतच्या तक्रारी पोलीस विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक तयार करून जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर पाळत ठेवली होती. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. नांदेड- सांगली- तेलंगणा- बिहार राज्यातील एकूण 5 आरोपींचा तस्करीत समावेश आहे.