चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व अडीच वर्षाच्या मुलाचा खून
औरंगाबाद /प्रतिनिधी - चारित्र्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित पतीने आपल्याच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हि घटना आज 9 जानेवारी रोजी पावणे दोन वाजेच्या पैठणरोड ते आनंद विहार जाणाऱ्या रोडवर धुत बंगल्या समोर असलेल्या समीर म्हस्के याच्या घरी घडली.सातारा पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या आईचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरती समीर म्हस्के वय 26 वर्ष, मुलगा निशांत समीर म्हस्के वय 2.5 वर्ष असे मयताचे नाव असून पती समीर विष्णु म्हस्के सासू सुनिता विष्णु म्हस्के दोन्ही रा. भाग्यनगर, बाबा पेट्रोलपंपाचे जवळ, औरंगाबाद असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर म्हस्के याच्या घरी आरती हीच्या चारीत्र्यावर संशय घेवुन, समीर याने त्याच्या आईच्या सांगण्यावरुन आरती व नातु निशांत यांनी आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबुन, आरतीचा व निशांतचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळुन खुन केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार हे करीत आहे.