जिल्हा परिषदेने घेतली ३० लाखाची वाहने

जिल्हा परिषदेने घेतली ३० लाखाची वाहने

औरंगाबाद/प्रतिनिधी
 पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकारी यांना फिरण्यासाठी वाहन मिळावे यासाठी जिल्हा परिषदेकडे वारवार मागणी होत असल्याने अखेर जिल्हा परिषदेने नविन चार महिंद्रा बोलेरो कंपनीची चारचाकी वाहने खरेदी केली आहे. हि नवीन वाहने उद्या (मंगळवार २१ डिसें) रोजी सभापती व गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे.  
जिल्ह्यातील अनेक सभापतींच्या व गटविकास अधिकाºयांची वाहने भंगार झाली आहे. त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात फिरण्यासाठी नवीन वाहने मिळावी यासाठी ते अनेक दिवसापासून मागणी करत होते. याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत मागणी देखील करण्यात आली होती. यावर सामान्य प्रशासन विभागातर्फे जेइएम पोर्टल द्वारे २१ आॅक्टोबरला महिंद्रा या चारचाकी वाहनांचे उत्पादन करणाºया महिंद्रा या कंपनीला  आॅर्डर दिली होती. त्यानुसार सोमवार (२०) रोजी चार वाहने जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाली. हि नवीन वाहने आज मंगळवार (२१) रोजी पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकारी यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. तर पुढील १० ते १२ दिवसात आणखी दोन बोलेरो जिल्हा परिषदेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका वाहनाची किंमत ७ लाख ४५ हजार २०२ रुपये इतकी असून, चार वाहनांची किंमत एकूण २९ लाख ८० हजार ८०८ रुपये इतकी आहे.  

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा