तलवार घेऊन फिरणाऱ्या तिघांना सिटीचौक पोलीसांनी केले जेरबंद
औरंगाबाद/प्रतिनिधी - शहरातील चंपा चौक परिसरात 24 फेब्रुवारी रोजी रात्री तलवारी हातात घेऊन दहशत निर्माण करत नागरिकांना आपली दुकाने बंद करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या त्या तिघांना सिटी चौक पोलिसांनी जेरबंद केले आहे
तलवारी हातात घेऊन गाड्यांची तोडफोड करणे आणि दहशत निर्माण करणे याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सरकारी पक्ष म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती या नंतर या तिघांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली होती या पथकांनी 1) शेख अश्फाक शेख इसाक वय 29 वर्ष रा. शहाबाजार,औरंगाबाद 2) शेख मुश्ताक शेख इसा वय 25 वर्ष व्यवासाय मजुरी रा. शहा बाजार लोकसेवा दुधडेअरी जवळ औरंगाबाद 3 ) शाहरुख रहेमतुल्ला खान वय 24 वर्ष व्यवसाय मॅकेनिक रा. शहा बाजार लोकसेवा दुधडेअरी जवळ औरंगाबाद. यांना जेरबंद केले.
अशफाक व अजिम यांनी दोघांनी तलवार धाराधार शस्त्र हातात घेवून तिघांनी संगनमत करून चंपा चौकातील मस्जीद समोर सेंट्रो कारवर दगड फेक करून तोडफोड करून नुकसान केले व गोल्डन बेकरी समोर उभी रिक्षावर दगडफेक करून रिक्षाची काच फोडुन नुकसान केले, तसेच हातात तलवार धारधार शस्त्र घेवून दुकानदारांना दुकान बंद करण्याच्या धमक्या येऊन आरडा ओरड करून दहशत निर्माण करून जनमाणसाचे दैनंदिन जीवन विस्काळीत करून सार्वजनिक शांतता भंग केली होती. तसेच पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांचे जा.क्र. विशा- 5 आदेश आबाद 2022 689, दि. 22/02/2022 आदेशा मधील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) व (3) चे शस्त्र यंदो आदेशाचे उल्लघंन केले म्हणून माझी त्यांचे विरुध्द भादवी कलम 336,427,34, सह कलम 4.25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 7 क्रिमीनल लॉ ॲमेंडमेट अॅक्ट सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन सिटीचांक गु.र.न. 66/2022 कलम 336,427.34. भा.द.वि सह 4.25 माहका सह कलम 7 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट आधिनियम सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करून यातील फरार झालेले आरोपी चे शोधा साठी पोलीस स्टेशनच्या दोन टिमने शोध घेवून 1) शेख अश्फाक शेख इसाक 2) शेख मुश्ताक शेख इसा 3 ) शाहरुख रहेमतुल्ला यांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मोहसिन सय्यद, पोउपनि रोहीत गांगुर्डे पोहेका विलास काळे, पोहेकॉ शेख शकील, संजय नंद, पोना संदीप तायडे, पोना शेख गफ्फार, पोना माजीद पटेल, पो.अ. देशराज मोरे, पो. अ. अभिजित गायकवाड, पो. अ. संतोष संकपाळ यांच्या पथकांनी केली.