राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवणार
नागपूर /प्रतिनिधी - नागपूर येथील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आज (३१ डिसेंबर २०२२ ) दुपारच्या सुमारास पोलिसांना नागपूर येथील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक निनावी फोन आला. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून या प्रकणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
संघाचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक निनावी फोन आल्यामुळे नागपूर पोलिसांनी संघ मुख्यालय परिसरात सुरक्षा वाढवली आहे. तसेच हा धमकी देणारा फोन नेमकी कुणी केला? ही धमकी कुणी दिली? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
नेमक काय घडलं?
आज (३१ डिसेंबर २०२२ ) दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी फोन आला. या निनावी फोनवरुन संघ मुख्यालय उडवण्याची धमकी देण्यात आली. या फोन नंतर तातडीने राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली. तसेच पोलिसांकडून विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, नववर्षाच्या पूर्वसंध्येला संघ मुख्यालय उडवून देण्याच्या निनावी फोनमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. तर या प्रकारमुळे पोलीस यंत्रणाही अलर्ट झाली आहे. तर संघ मुख्यालयाला मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे.