शहरातील उच्चभ्रू वसाहतीत गांजा विक्री
औरंगाबाद/प्रतिनिधी - शहरातील उच्चभ्रू वसाहतीत गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्या ताब्यातून ६ किलो गांजा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, पिशव्या असा सुमारे पाऊण लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई जवाहरनगर भागातील शास्त्रीनगर मध्ये करण्यात आली.सचिन राजू ठोंबरे वय-२९ (रा.शास्त्रीनगर, जवाहरनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर भागात आरोपी सचिन ची प्रेस नावाने पानटपरी आहे. परिसरातील नागरिकांना संशय येऊ नये. शिवाय गुप्तता राहावी. यासाठी तो गांजा विक्रीचा व्यवसाय टपरीमधूनच चालवायचा. अशी माहिती गुन्हेशाखेचे पोलीस उप निरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाला मिळाली होती. मंगळवारी रात्री पथकाने छापा टाकून सचिनच्या ताब्यातून ६ किलो ३६० ग्राम गांजा, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, व गांजा विक्री साठी वापरले जाणारे छोटे पाऊच असा सुमारे ६८ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने हा प्रतिबंधित गांजा कोठून आणला? अजून त्याचे साथीदार आहेत का? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, जवाहरनगर पोलीस ठाण्याचं पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहाय्यक फौजदार रमाकांत पटारे, शेख हबीब, पोलीस हवालदार विजय निकम, विरेश बने, संदीप सानप, किशोर खंडागळे, महिला पोलीस शिपाई संजीवनी शिंदे यांच्या पथकाने पार पाडली आहे