महानगरपालिकेत झाडे कोसळून वाहनांचे नुकसान पहा व्हिडिओ

औरंगाबाद /प्रतिनिधी - आज  शहरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस व चक्री वादळाने महानगरपालिका मुख्यालय बाहेरील भिंत व झाड कोसळून तेथे उभ्या असलेल्या 1 आटो रिक्षा आणि ४ चारचाकी वाहने याच्यात मारुती 800 ,महिंद्रा एसयूव्ही,टाटा नॅनो, स्पार्क व तवेरा या गाड्यांचे नुकसान झाले आहे.
 मनपा मुख्यालय टप्पा क्र 3 येथील व मनपा पार्किंग  कँटीन बाजूला असलेले झाड कोसळले असून टाऊन हॉल कला दालनाचे छतावरील कौलारू कोसळले आहे .याठिकाणी असलेले लिंबाचे झाड कोसळले असून कला दालन भिंती बाहेरील उभ्या असलेल्या मारुती अल्टो गाडीवर झाडाची फांदी पडून नुकसान झाले आहे.या ठिकाणी विद्युत पुरवठा खांब पडून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
मनपा अग्निशमन विभाग,उद्यान विभाग ,वार्ड कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम सुरू करून रस्त्यावर पडलेले झाडे बाजूला करून रहदारीस झालेला अडथळा दूर करून वाहतूक पूर्ववत केली.
या ठिकाणी महानगरपालिका  प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी  झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,जागतिक पर्यावरण गतीने बदलत आहे, आणि याचा परिणाम चक्री वादळ किंवा कमी वेळेत जास्त पाऊस अशा प्रकारच्या घटना वाढलेल्या आहेत.नागरिकांनी पर्यावरण च्या दृष्टीने वागणे आता गरजेचे झाले आहे.मी नागरिकांना आवाहन करतो की ,त्यांनी पर्यावरणाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी  अश्या  जीवन शैलीचा अवलंब करावा ज्याच्यात कमीत कमी कचरा होईल.यामुळे पर्यावरणाला नुकसान कमी होऊन आज सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी होईल.
ते पुढे म्हणाले की,मुसळधार पावसाचा इशारा काल संध्याकाळीच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी याना देण्यात आला होता. काल रात्री पासून सर्व अधिकारी ,कर्मचारी सतर्क असून उदभवलेल्या परिस्थिती ला तोंड देत आहे.नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त -1 बी बी नेमाने,अतिरिक्त आयुक्त -2 रविंद्र निकम ,शहर अभियंता एस डी पानझडे,उप आयुक्त संतोष टेंगळे ,सौरभ जोशी,घनकचरा कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे,उद्यान अधीक्षक विजय पाटील,कार्यकारी अभियंता एस डी काकडे ,फड,वार्ड अधिकारी,जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांची उपस्थिती होती.

खामनदी व नाले सफाई मुळे  कमी परिणाम

यावेळी प्रशासक म्हणाले की,यावर्षी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत खामनदी पुनर्जीवन मोहिमे अंतर्गत खाम नदीचे पात्र खोल करणे ,त्याची साफसफाई करणे,नदी चा प्रवाह सुरळीत करणे तसेच नदी काठा वरील अतिक्रमण काढणे आणि खाम नदी वरच्या पुलावरून लोकांनी नदीत कचरा किंवा मलबा टाकू नये यासाठी नाल्याच्या भिंतीवर दोन्ही बाजूला संरक्षित जाळ्या बसविण्यात आल्याने नदी काठावरील आणि नदी जवळील  सखल भागात पाणी शिरण्याचे प्रमाण जवळपास शून्य झाले आहे. तसेच यावर्षी शहरातून वाहणारे नाल्यांची सफाई देखील चांगल्या प्रमाणात महानगरपालिकेतर्फे करण्यात आली असून पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान कमी होत आहे .पुढील वर्षी अजून चांगल्या पद्धतीने नाल्यांची सफाई करण्यात येईल जेणे करून नागरिकांना त्रास कमी होईल.ते म्हणाले.
सद्य स्थितीत जलाल कॉलनी,हिलाल कॉलनी व खाम नदी काठा वरील इतर वसाहती येथील खाम नदी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असूनही परिस्थिती नियंत्रणात आहे.उपाय योजना म्हणून या सर्व ठिकाणी महानगर पालिकेचे कर्मचारी तैनात आहेत.तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा