छत्रपती संभाजी नगरच्या धुळे सोलापूर हायवे वर भीषण अपघात
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगरातील एस आर पी कॅम्प पुलावर धुळे सोलापूर हायवे ला आज सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात झाला.
सोमवार दिनांक 27 रोजी सकाळी 7 वा. 13 मी.केमिकल टँकर (AP: 39 TR :8744) ने ट्रक(HM : 20 9548) ला मागून जोराची धडक दिली. यात टँकर चालक हा गाडीच्या केबिनमध्ये जखमी अवस्थेत अडकला होता त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे पथक उप अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे, ड्युटी इन्चार्ज लक्ष्मण कोल्हे, विनायक लिमकर, अग्निशमक दीपक गाडेकर, रितेश कसुरे, संदीप मुंगसे, समीर शेख यांनी सहकार्य केले.