मनपा प्रियदर्शनी शाळेत लसीकरण मोहिमेस सुरवात
औरंगाबाद / प्रतिनिधी - शासन निर्देशानुसार आज पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्दार्थ्यांना कोविड प्रतिबंधिक लसीकरणाची सुरुवात होत आहे.
या अनुषंगाने आज औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे मनपा प्रियदर्शनी केंद्रीय विद्दालय येथे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.यावेळी आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उप महापौर स्मिता घोगरे, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा ,शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी तथा मुख्याध्यापक संजीव सोनार ,शिक्षक कर्मचारी ,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना प्रशासक म्हणाले की ,आज घडीला महानगर पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ आणि लसींची उपलब्धता आहे.नागरिकांनी आपल्या आरोग्य सुरक्षिततेसाठी आपले दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे.आजपर्यंत शहरातील नागरिकांचे 82 ते 85 % लसीकरण झाले आहे.लवकरच उर्वरित नागरिकांचे 100 %लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.यासाठी महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कमीत कमी काळात 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
कोविड लसीकरण सोबत कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे असे प्रतिपादन
मा पालकमंत्री सुभाष देसाई आज 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहिमेची सुरुवात प्रसंगी म्हणाले की,कोरोना विरुद्ध ची लढाई अजूनही सुरू आहे .याकरिता आपण सर्वांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.विद्दार्थ्यांनी लसीकरणा सोबत कोविड नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे. त्यांनी आपल्या घरातील लसीकरण राहिलेल्या व्यक्तींना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन त्यानी यावेळी केले. लॉकडाऊन टाळणे आपल्या हातात आहे त्याकरिता सर्व नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रियदर्शनी शाळेतील पाच विद्दार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लसींचा पहिला डोस देण्यात आला.
शाळेतील 40 विद्दार्थ्यांना लस देण्यात आली .या प्रसंगी वैद्दकिय अधिकारी डॉ मेघा जोगदंड, डॉ संगीता पाटील,डॉ प्रेमलता कराड ,डॉ बाळकृष्ण राठोडकर,डॉ प्रेरणा संकलेचा ,शिक्षक शशिकांत उबाळे,सुरेखा महाजन ,तेजस्विनी देसले, नर्सेस , कर्मचारी आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजीव सोनार यांनी केले.