शिवसेनेच्या मीरा पाटील भाजपाच्या प्रचारात

औरंगाबाद /प्रतिनिधी - शिवसेनेच्या औरंगाबाद पश्चिम तालुक्याच्या माजी महिला संघटक मीरा पाटील या वडगाव कोल्हाटी बजाज नगर सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक सहा मध्ये भाजपाचा प्रचार करणार असल्याची माहिती मीरा पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे.
 शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाठ यांचे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनल  बजाज नगर वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत निवडणुकीत असल्याने त्यांनी शिवसेनेला उमेदवार मिळू दिले नाही मिळालेले उमेदवार ऐन वेळेवर गायब केले त्यामुळे प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेनेला उमेदवार नसल्याने तसेच उमेदवार देताना मला विश्वासात घेतले नाही. असा आरोप करत मीरा पाटील यांनी प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपाचे उमेदवार निलेश सोनवणे, मोहिनी बजरंग पाटील, वैशाली विजय खेडकर यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. मीरा पाटील या पश्चिम विभागाच्या तालुका महिला संघटक होत्या तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कट्टर समर्थक आहेत तसेच त्यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकीत 1800 मतं घेतली होती. त्यामुळे वार्ड क्रमांक सहा मध्ये त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा फायदा भाजप प्रणित परिवर्तन विकास पॅनलला होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये होत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा