फ्रंट वर्कर व ६० वर्षा पुढील नागरिकांना  बुस्टर डोस

फ्रंट वर्कर व ६० वर्षा पुढील नागरिकांना  बुस्टर डोस

औरंगाबाद/ प्रतिनिधी- केंद्र शासनाच्या आदेशानुसार 10 जानेवारी पासून  सर्व आरोग्य केंद्रावर आरोग्य व इतर श्रेत्रातील फ्रंट वर्कर व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना (प्रिकोशन )बूस्टर देण्यात आला.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाल्यापासून शहरातील १२ हजारपेक्षा अधिक मुलांना लस देण्यात आली आहे. रुग्ण वाढ लक्षात घेता फ्रंट लाईन वर्कर आणि  ६० वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना तिसरा ( प्रिकोशन) बुस्टर डोस  आज 10 जानेवारी सोमवार  पासून देण्यात आला.

फ्रंट वर्कर व  ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरातील ५६ ठिकाणी कोरोना लसीकरणाची  व्यवस्था करण्यात आली होती,केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे ६० वर्षावरील नारिकांना ज्यांना मधुमेह, रक्तदाब व इतर आजार आहे. त्यांच्यासाठी कोरोनाचा तिसरा बुस्टर डोस प्राधान्याने  उपलब्ध  करुन दिला आहे. यापूर्वी या नागरिकांनी ज्या कंपनीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. त्याच कंपनीचा तिसरा डोस घेणे बंधनकारक आहे.  दुसरा डोस घेतलेल्या तारखेपासून ९ महिने ३९ आठवडे ज्यांना पूर्ण झाले आहे.  असे फ्रंट वर्कर आणि  जेष्ठ नागरिक हा डोस घेण्यासाठी पात्र असतील. असे मनपाच्या आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा