बॅनर च्या वादातून केला गोळीबार तरुण गंभीर जखमी
जालना/ प्रतिनिधी - बॅनर लावण्याच्या वादातून जालना तालुक्यातील रामनगर येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. रात्री ही हाणामारी झाली आहे.
हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणावर गोळीबार केला आहे. पोटावर गोळी लागल्याने हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे.
रामनगरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी यांच्यात रात्री रोडवर बॅनर लावण्याचा कारणावरून वाद झाल्याची घटना घडली होती. या वादाचं रूपांतर सकाळी मोठ्या हाणामारीत झालं आणि दोन्ही गट आमने सामने आल्याने दोन गटात हाणामारी झाली. या वादात रमेश जोशी यांनी शेजुळ गटाच्या तरुणावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. विजय ढेगळे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या पोटात गोळी लागल्यानं हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.