श्री गणेश महासंघ उत्सव समितीने केले जागेवरच विसर्जन !
औरंगाबाद /प्रतिनिधी - श्री गणेश विसर्जनानिमित्त जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन आणि श्री गणेश महासंघ उत्सव समिती यांनी श्री गणेश विसर्जनासाठी पारंपारीक विसर्जन विधी पार पाडत जागेवरच श्री विसर्जन करून कोविड जन्य स्थितीवर गर्दी टाळण्यासाठी विसर्जन मिरवणूक सुद्धा रद्द केल्यामुळे प्रशासनाने विशेष आभार व्यक्त केले.
अत्यंत नियोजन बद्ध पद्धतीने संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार आणि या वर्षाचे अध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी नियोजन केले असल्यामुळे प्रचंड असा सामाजीक फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केल्या गेले.
१९सप्टेंबर रोजी सकाळी श्री गणेश महासंघ उत्सव समिती कार्यालयात केंद्रीय मंत्री भारत सरकार डॉ भागवत कराड, जेष्ठ आमदार हरिभाऊ बागडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे,आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट,आ. प्रदीप जैस्वाल, आ. अतुल सावे,पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता,माजी आ. डॉ.कल्याण काळे,माजीआमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आमदार सुभाष झाम्बड,माजी आ. कैलास पाटील, प्रकाश मुगदिया, विलास बापू औताडे,माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर बापू घडामोडे, माजी ,अनिल मकरिये,प्रफुल्ल मालाणी, रतनकुमार घोंगते, राजेंद्र दानवे, सचिन खैरे,पोलीस उपायुक्त निकेश खटमोडे,पोलीस निरीक्षक अशोक गिरी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री ची आरती संपन्न झाली.
या प्रसंगी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक देशमुख यांचा नियोजन बद्ध कार्यक्रमाचे नियोजन केल्या बद्दल केंद्रीय मंत्री भारत सरकार डॉ भागवत कराड आदी मान्यवरांनी सत्कार केला.
<span;>श्री बालाजी धर्मशाळा संस्थेचे विश्वस्त राजू सेठ चिचाणी यांनी सतत दहा दिवस मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात करण्यात आला.
आजच्या या विशेष कार्यक्रमाचे सूत्रबद्ध सूत्रसंचालन कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी केले.
श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतिने मान्यवरांचे अध्यक्ष अभिषेक देशमुख कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांचे सह अनिल पाटील मानकापे,किशोर तुलसीबागवाले ,सुरेश टाक, हरीश शिंदे, संदीप शेळके, अनिकेत पवार, उल्हास नरवडे पाटील, विक्की राजे पाटील, मोहीत त्रिवेदी, विशाल दाभाडे, विशाल पुंड,राजू पारगावकर, चंद्रकांत जोजारे,राजेंद्र कुलकर्णी, सिताराम पहाडिये, सुनील चौधरी, धिरज पवार, सुभाष उदावंत, कमलाकर दहिवाल,संदीप चादरे आदींनी केले.
गणेश उत्सवाच्या काळात सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, प्रकाश मुगदिया, प्रा मनोज पाटील, अनिल मकरिये, राजेंद्र जंजाळ,विजय औताडे, अनिकेत पवार, विजयराव साळवे,रफिक अहेमद, सय्यद अक्रम, हिशाम उस्मानी, विजय वाघचौरे, सुहास दाशरथे,सन्नि बारवाल, राजु काका नरवडे, प्रफुल्ल मालानी, सचिन पवार, ऋषिकेश जैस्वाल, राजु परळीकर, चेतन जांगडे, सचिन खैरे, मोहिंदर बाखरिया, जगदीश सिध्द, सुरेश टाक, किशोर तुलसीबागवाले, हरिष शिंदे, संदीप शेळके, राजेंद्र दानवे, रतन घोंगते, चंद्रकांत जोजारे, विशाल पुंड विक्कीराजे पाटील, सुनील चौधरी, उल्हास नरवडे पाटील, विशाल दाभाडे, राजु पारगावकर, सीताराम पहाडिये, रमेश देवावाले, विशाल काकडे, दिनेश सुखधान, नारायण कानकाटे, सुनिल जाधव, धिरज पवार, सुनिल जाधव, संदीप शिरसाठ, सुभाष कच्छवाह, शिवाजी कवडे, राजेश मेहता,महेश उबाळे, विजय निकाळजे यासह अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
जिप औरंगपुरा येथील विहरीवरील श्री गणेश विसर्जन रात्री ९.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासन यांचे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार श्री गणेश महासंघ उत्सव समिती मार्फत करण्यात आला.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच सर्व गणेश भक्त, गणेश मंडळे आदींनी सर्व उत्सव काळात मोलाचे सहकार्य केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहे.