राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मेन्स वेअरचे उदघाटन संपन्न

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मेन्स वेअरचे उदघाटन संपन्न

सिल्लोड / प्रतिनिधी -  सिल्लोड शहरातील आर.एल. पार्क भागात नव्याने सुरू झालेल्या नगरसेवक मेन्स वेअरचे उदघाटन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नगरसेवक मेन्स वेअरचे दिपक वाकडे यांना त्यांच्या नवीन व्यवसायानिमित्त शुभेच्छा दिल्या.

     यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्षा राजश्रीताई निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ.मॅचिंद्र पाखरे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड आदींची प्रमुख  उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा